मध्यप्रदेशातील शासकीय महाविद्यालयाला श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे नाव   

पुण्यात निर्णयाचे स्वागत

पुणे : मध्यप्रदेश सरकारने खरगोन जिल्ह्यातील सनावद येथील शासकीय महाविद्यालयाचे नामकरण ‘श्रीमंत बाजीराव पेशवा शासकीय महाविद्यालय, सनावद’ असे केल्याबद्दल शनिवारवाड्यावर थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान आणि पालखेड युद्ध स्मारक समितीच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला.
 
या निर्णयाबद्दल मध्यप्रदेश शासनाचे आभार मानून पेढे वाटण्यात आले आणि ऐतिहासिक सन्मानाचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे, इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत, श्री देवदेवेश्वर संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत, प्रतिष्ठानचे खजिनदार श्रीकांत नगरकर, तसेच स्मारक समितीच्या विद्या घटवाई, मयुरेश अरगडे, नंदकुमार कदम आणि मनोज कुलकर्णी आदी उपस्थित होते. हा सन्मान पेशव्यांच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देणारा असून, यामुळे पुढील पिढ्यांमध्ये ऐतिहासिक जागरूकता वाढण्यास मदत होईल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
 

Related Articles